आचारसंहिता भंग प्रकरण ; अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Navneet Rana-Anil Deshmukh

अमरावती : गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Navneet Rana) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांसह 17 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती आहे .

26 मार्च 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी नवनीत राणा यांनी भव्य रॅली काढली होती. या रॅलीत गृहमंत्री अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बाबा राठोड, हर्षवर्धन देशमुख, गणेश खारकर, संगीता ठाकरे, अभिनंदन पेंढारी, पुष्पाताई बोंडे, सुनील वऱ्हाडे, रामेश्वर अभ्यंकर, गणेश राय, जितू दुधाने, ज्योती सैरासे, प्रशांत कांबळे, रसीद खा असे एकूण 17 जण उपस्थित होते.

आदर्श आचरसंहितेतील कलम 144 नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 200 मीटर परिसरात फक्त 5 लोकांनी उपस्थित राहण्याची परवानगी असते. मात्र नवनीत राणा यांनी भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक नियंत्रण कक्षाचे फ्लाईंग स्कॉड अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी गाडगे नगर पोलीस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली होती. यानुसार नवनीत कौर राणा, अनिल देशमुख यांच्यासह 16 जणांविरुद्ध भादंवि कलम 188 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय देताना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एफ.ए. देशपांडे यांनी सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER