आमदार रवी राणांसह शेतकऱ्यांची कारागृहातून सुटका ; आता हजारो शेतकऱ्यांसह ‘मातोश्री’वर धडक देणार!

Ravi Rana

अमरावती : अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी रास्तारोको केल्यानंतर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. आज अखेर रवी राणा यांनी सत्र न्यायालयातून जामीन मिळवला आहे. त्यामुळे रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप करत रवी राणा यांनी हजारो शेतकऱ्यांसह उद्या ‘मातोश्री’वर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, लॉकडाऊनच्या काळात आलेलं वीज बिल माफ करा या मागणीसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. त्यानंतर रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 2 तास अडवून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत हे आंदोलन मोडून काढत आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER