जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींसह पाच जणांचा समावेश

Pm Modi & Ayushman Khurana

नवी दिल्ली : टाईम मॅगझिननं जगभरातील सर्वांत  प्रभावशाली १०० लोकांची यादी घोषित केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushman Khurana), एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामील असलेल्या बिल्किस यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. हे सर्व लोक या वर्षी जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले आहेत.

टाईम मॅगझिननं पंतप्रधान मोदी यांच्याविषयी लिहिलं आहे की, “लोकशाहीसाठी सर्वांत आवश्यक स्वतंत्र निवडणुकाच नाही. यामध्ये केवळ कोणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे ज्यांनी विजेत्याला मत दिलं नाही. भारत गेल्या सात दशकांपासून सर्वांत  मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे.

” असं टाइम मॅगझिननं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्‍साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प, कमला हॅरिस, जो बिडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER