किमान शिवजयंतीला १४४ कलमाची अट शिथिल करा; राष्ट्रवादीच्या आमदाराकडून मागणी

Amol Mitkari - Uddhav Thackeray

मुंबई : कोरोना (Corona) रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनं नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, असं सरकारनं सांगितलं असून साध्या पद्धतीने शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू केला आहे. त्यामुळे, शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. भाजपानेही (BJP) शिवजयंतीदिनी कलम १४४ लागू केल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर जबरी टीका केली आहे.

तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीदेखील निदान शिवजयंतीच्या दिवशी तरी १४४ कलमाची अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ‘शिवजनमोत्सवाच्या अनुषंगाने उद्याच्या दिवसापुरती १४४ कलमाची अट शिथिल करण्यात यावी ही असंख्य शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन मीदेखील एक शिवप्रेमी म्हणून विनंती करतो.’ असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER