माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही

amol-mitkari-slams-gopichand-padalkar

सांगली :  माता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडमाझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाहीळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासोबतही पडळकरांनी वाद घातला होता. या संपुर्ण प्रकारानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचे नाव न घेता त्यांच्यावर मोठा शाब्दिक घणाघात केला आहे.

“तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? असे म्हणत मिटकरी म्हणाले, मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

म्हैसाळ येथे अमोल मिटकरी यांचे शिवचरित्र्य व्याख्यान आयोजित केले होते. राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोहनराव शिंदे साखर करखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER