उद्धव-मोदी भेट : भाजप ‘शकुनी’ डाव टाकणारच; अमोल मिकारींचा घणाघात

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज पंतप्रधानांची (PM Modi) भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणसुद्धा मोदींना भेटणार आहेत. या भेटीकडे मराठा समाजासह महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mikari) यांनी ट्विट करत ठाकरे-मोदी भेटीवरून भाजपवर (BJP) निशाणा साधला.

ठाकरे-मोदी भेटीवरून मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे, देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजुन घेतील. मात्र, कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारिपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही.” असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही घणाघात केला. “बैठकीला सुरुवात होण्याआधीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार वर बोलायला लागले. अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झालाय. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं त्यांच्याकडे काही शिल्लक नाही.” असेही ते म्हणाले.


Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button