महाविकास आघाडीकडून बैठकीचं निमंत्रण नसल्याने अमोल मिटकरी नाराज

Amol Mitkari-MVA

परभणी : राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या ५जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकासआघाडी अंतर्गत एकत्रितपणे मैदानात आहेत. त्यामुळे आघाडीची ताकद वाढल्याचं बोललं जातंय. मात्र, आता या तिन्ही पक्षांमधील नाराजी नाट्य पुन्हा एकदा पुढे आलं आहे. अकोला जिल्ह्यात शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित आघाडीच्या बैठकीत सर्व आमदार उपस्थित असताना केवळ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीच गैरहजर होते. यावर विचारले असता त्यांनी संबंधित बैठकीचं निमंत्रणच नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका आहेत. अमरावती विभागातून महाविकास आघाडीकडून श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी (21 नोव्हेंबर) अकोल्यात आले होते. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित होते. पण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी गैरहजर होते. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

याबाबत परभणीत आलेल्या अमोल मिटकरी यांना विचारलं असता ते म्हणाले, “अकोल्याच्या बैठकीचे मला कोणतेही निमंत्रण नसल्याने मी बैठकीला उपस्थित नव्हतो. याचा अर्थ आघाडीत बिघाडी आहे, असा होत नाही.” याबाबत मी माझी नाराजी श्रीकांत देशपांडे आणि पक्ष श्रेष्टीनं कळवली असल्याचंही अमोल मिटकरी यांनी नमूद केलं.

ही बातमी पण वाचा : उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे – अमोल मिटकरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER