‘एकटा निघाला तुडवित रान, उधळित प्राण, महाराष्ट्र घडविला…’ अमोल कोल्हेंची पवारांवर खास कविता

Amol-Kolhe-Sharad-Pawar

पुणे : जागतिक मराठी भाषादिनानिमित्त शिरूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खास कविता लिहून पवारांच्या राजकीय झंझावातावर प्रकाश टाकला आहे. ‘तो एकटा निघाला’ कविता लिहिली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार या झंझावातास प्रणाम केला आहे. शरद पवार यांना वंदन करत असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले आहे.

ही कविता कोल्हे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रातून फुंकार एक उमटला, पुरोगामी महाराष्ट्रातून फुंकार एक उमटला, तुडवित रान, उधळित प्राण तो एकटा निघाला… रक्ताळले पाय जरी काट्यांनी रक्ताळले पाय जरी अगणित घाव ते उरावरी ओरखडा पडी काळजावरी कधी न उमटू दिला, तो एकटा निघाला…बदनामीचे पचवून प्याले, बदनामीचे पचवून प्याले, विराधाचे झेलून भाले… जिद्द पेरून पावलात, ना थांबला, ना संपला, तो एकटा निघाला… बळीराजाची घेता साद, बळीराजाची घेता साद, कर्जमाफीचा क्षणी प्रतिसाद, स्वयंपूर्णता अन्न, धान्यात, देश उन्नतीचा मार्ग रेकीला… तो एकटा निघाला…कला, क्रीडा, साहित्यप्रेमी, कला, क्रीडा, साहित्यप्रेमी, विश्व प्रगतीचे भान नेहमी तळहातांच्या रेषांपरी तयाने हा महाराष्ट्र जाणला… तो एकटा निघाला विज्ञानाची धरुनी कास, केला सत्य शाश्वत विकास, यशवंतरावांचा पट्टशिष्य हा सच्चा वारस शोभला… तो एकाटा निघाला…अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, मूर्त केले महिला धोरण… दूरदृष्टिच्या निर्णयांचा… तो धोरण कर्ता झाला… तो एकटा निघाला… तत्त्वासाठी सदैव नडला…तत्त्वासाठी सदैव नडला…दडपशाहीला निर्भीड भिडला…तरुणाईच्या मनावरही संघर्ष योद्धा म्हणूनही जडला… जरी एकटा निघाला… जरी एकटा निघाला… तरी गारुड जनामनाला, जनसागर उसळत गेला… विकास गाण घुमवित छान… त्याने महाराष्ट्र घडविला तुडवित रान, उधळित प्राण, त्याने महाराष्ट्र घडविला. अशी कविता सादर करून पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER