महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत?- अमोल कोल्हे

Amol Kolhe

पुणे :  हाथरसमध्ये (Hathras) एका दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर उपरादरम्यान या मुलीचा दिल्लीतल्या रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली .

महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवट (President’s rule) लावण्याची मागणी करणारे उत्तर प्रदेशातील घटनांच्या वेळी कुठे जातात, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.

राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना लोकशाहीवर घाला घालणारी असून उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याची टीका शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

देशात लोकशाहीचा गळा घोटला जातोय, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले .

ही बातमी पण वाचा : हाथरस प्रकरण : बलात्काऱ्यांना फासावर लटकवा – इम्तियाज जलील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER