…. तेव्हा गवतालाही भाले फुटतात हा देखील इतिहास आहे ; अमोल कोल्हेंनी करुन दिली शरद पवारांच्या सभेची आठवण

Sharad Pawar - Amol Kolhe

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेच्या आठवणींना उजाळा दिला.

दिल्लीच्या तख्तापुढे कधीही न झुकणाऱ्या स्वाभिमानी माणसांचा हा महाराष्ट्र आहे. जेंव्हा हिमालय अडचणीत येतो तेंव्हा त्याला सह्याद्रीची आठवण येते हा इतिहास आहे.पण जेंव्हा सह्याद्रीलाच आव्हानं दिली जातात तेंव्हा इथल्या गवतालाही भाले फुटतात हा देखील इतिहास आहे, अशी भावना कोल्हे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केली आहे.

सोबतच, कोल्हे यांनी शरद पवारांचा पावसातील सभेचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे आज ट्विटरच्या प्रोफाईलवरही कोल्हे यांनी पवारांचा पावसातील सभेचा फोटो लावला आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची साताऱ्यात मोठी सभा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभेबद्दल उत्सुकता होती. पाटणमधील सभा उरकून पवारांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवताच पाऊस सुरू झाला; पण लोक जागचे हलले नाहीत. पवार बोलायला उभे राहिले आणि पावसाचा जोर वाढला. लोक समोर भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरची छत्री बाजूला केली आणि धो-धो पावसाबरोबरच धीरगंभीर आवाजात शरद पवारही बरसू लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER