मालिकेतून संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार : शिवसेनेच्या नेत्याची माहिती

Amol Kolhe

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे भाग प्रदर्शित करू नये, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. अखेर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार असल्याचं आश्वासन डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली असल्याची माहिती खोतकर यांनी सांगितली .

‘मालिकेतील संभाजी महाराजांचे अटकेनंतरचे हाल दाखवू नये’, सेनानेते खोतकरांची मागणी

संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ करून त्यांना यातना देण्यात आल्या त्या पाहणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुऴे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकण्याची भीतीही अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली होती.

दरम्यान ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करण्यात येत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत होत्या. मात्र या केवळ अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका असे ट्विट करत अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.