अमोल कोल्हे यांनी दिवाळीनिमित्त घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट

अमोल कोल्हे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

मुंबई : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिवाळीनिमित्त (Diwali) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. ‘शिवगंध’ पुस्तक बाबासाहेब पुरंदरे यांना भेट दिले. बाबासाहेब पुरंदरे यांनी कोल्हे याना ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ हे पुस्तक दिवाळी भेट म्हणून दिले. फेसबुक पोस्ट करत अमोल कोल्हेंनी ही माहिती दिली आहे.

आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित ‘शिवसंस्कार सृष्टी’ या प्रकल्पाची माहिती घेऊन या संकल्पनेचे त्यांनी भरभरून कौतुक केले. स्वराज्यजननी जिजामाता मालिका, आगामी चित्रपट यावर मोलाचे मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी ‘शिवगंध’ पुस्तक त्यांना दिले आणि त्यांच्याकडून ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ ही दिवाळी पुस्तक भेट मिळाली. वयाचे शतक साजरे करणाऱ्या एका आदरणीय शिवप्रेमीच्या सहवासातील हा अविस्मरणीय दिवाळसण, असे मनोगत डॉ. अमोल कोल्हेंनी व्यक्त केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER