पूर्वाश्रमीचे शिवसैनिकअमोल कोल्हे यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट, ‘शिवबंध’ दिल भेट

Aaditya Thackeray - Amol Kolhe

मुंबई : पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक (Shiv Sena) तथा सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भेट घेतली. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर अमोल कोल्हेंनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची भेट घेतली असली तरी, भेटीच्या फोटोवरून त्यांच्यात कुठलीही कटुता दिसून येत नाही.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांवर अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. ‘भक्ती-शक्ती काॅरीडाॅर, ‘शिवसंस्कार सृष्टी’ आणि मतदारसंघातील पर्यटनाच्या संधी या विषयांवर आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. या भेटीचा तपशील अमोल कोल्हे यांनी सोशल मिडीयावरुन दिला आहे.

विविध योजना, मतदारसंघातले रखडलेले प्रश्न, पर्यटनाच्या संधी यांसह अनेक विषयांवर आदित्य ठाकरे-अमोल कोल्हे यांच्यामध्ये चर्चा झाली. ही चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. यावेळी अमोल कोल्हेंनी शिवगंध हे स्वत: लिहिलेलं पुस्तक आदित्य ठाकरे यांना भेट दिलं. भेटीनंतर औपचारिक फोटोसेशनही पार पडलं. फोटोत दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्यबरच काही सांगून जातआहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER