…,तेव्हा आपण इतर राज्यातील सरकारं पाडण्यास मग्न होतो, त्याचा परिणाम आता देशाच्या प्रत्येक नागरिकाना भोगावा लागत आहे

Amol Kolhe

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament monsoon session) दिल्लीत सुरू आहे. सभागृहात आज खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी कोरोनाच्या (Corona) गंभीर स्थितीवर परखड भाषण केले. भाषणातून त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आज देशात कोरोना एवढ्या मोठ्या प्रमाणावर फोपावला असल्याचे राष्ट्रवादीचे नेते शिरूरचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून कोरोनाच्या गेभीर स्थितीवर भाष्य करताना थेट केंद्रसरकारवर निशाणा साधला ते म्हणाले, देशातील तमाम नागरिकांना सरकारवर विश्वास होता. सरकार कोरोनावर नक्की नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावलं उचलतील तसे प्रयत्न करतील. या विशावासाच्या जोरावर देशाच्या नागरिकांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, शंखनाद केला, दिवे लावले का केलं हे तर केवळ आपल्यावरच्या विश्वलासापोटी अशा शब्दांत डॉ. कोल्हे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडजले.

ते म्हणाले, जेव्हा देशातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहीजे होते तेव्हा आपण इतर राज्यातील सरकारं पाडण्यात मग्न होतो आणि याचा परिणाम आज देशातील प्रत्येक नागरिकाला भोगावा लागत आहे.

काय म्हणाले भाषणात खासदार कोल्हे –

डॉ खासदार कोल्हे यांनी भाषणातून कोरोनाची विदारक स्थिती सांगितली. ते म्हणाले, 9 महिन्यांपासून आपण कोरोनासोबत जगत आहोत. सरकार म्हणतंय भारताचा रिकव्हरी रेट चांगला आहे. पण आपण एक सत्य नाकारू शकत नाही की, 90 हजार लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. आणि या मृत्युंमध्ये स्थलांतरीत मजुरांचे मृत्यू, व्यवसाय बुडाला म्हणून झालेल्या आत्महत्या अशा मृत्युंचा समावेश नाही.

देशाची जनता सरकारला उत्तर मागत आहे की, जेव्हा कोरोना देशात पसरत होता तेव्हा तुम्ही अमेरिकी राष्ट्राध्यक्षासोबत व्यस्त होते. जेव्हा देशातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहीजे होते तेव्हा आपण इतर राज्यातील सरकारं पाडण्यात मग्न होतो आणि याचा परिणाम आज देशातील प्रत्येक नागरिकाला भोगावा लागत आहे.

दुरदृष्टी दाखवत आपण तेव्हाच प्रत्येक इंटरनॅशनल एअरपोर्टवर प्रत्येक प्रवाशांचे टेस्ट केले असते तर आज ही परिस्थिती आली नसती. त्यानंतर आपण सरप्राइज इव्हेंटसारखे लॉकडाऊन देशावर लादले.

लॉकडाऊन लावताना आपण हा विचार नाही केला की याला फेजच्या तत्वावरदेखील लावण्यात येऊ शकतो. हा विचार नाही केला की, मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार फक्त शहरी भागात होता ग्रामीण भागात नाही आणि नाही आपण लोकांना पुर्वतयारी करण्यास वेळ दिला.

लादून दिला देशव्यापी लॉकडाऊन.

ते म्हाणाले, शेतक-यांच्या हातातले पिक गेले, कित्येकांची रोजीरोटी गेली. स्थलांतरीत कामगारांना शेकडो किलोमिटर पायी चालत जावं लागलं. लोकांनी मुलांना बिस्कीट खावू घालून त्यांची भूक भागवली. पाणी पिऊन झोपवलं.

तुम्ही म्हटलं, टाळ्या वाजवा, आम्ही वाजवल्या. घंटा नाद केला शंख नाद केला. दिवे लावले. आम्ही सगळं केलं आपल्यावर विश्वास ठेवून केलं. विश्वास हा होता की, सरकार पुर्णपणे कोरोनावर नियंत्रण मिळवणार.

ऑक्सीजन सिलेंडर, व्हेंटीलेटर बेड यासंबंधीत आकडेवारी रोज पाहायला मिळते मात्र, वास्तविक हे आहे की, ऑक्सीजन बेड मिळवण्यासाठी, व्हेंटीलेटर मिळवण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते परिणामी अनेकांना उपचाराविना मृत्युला सामोरे जावे लागत आहे. काय देशाने आपल्यावर विश्वास आदाखवाल त्याचं हे फळ आपण देशवासीयांना दिले. आज 9 महिन्यानंतरही देशातील सर्वशक्तीशाली सरकार ही दहशत लोकांच्या मनातून काढू शकली नाही.

आज कोरोनाच्या मृत्युसंख्येत देश दुस-या स्थानावर आहे आणि रोग प्रसारणात पहिल्या अशा प्रखर शब्दातून खासदार कोल्हे यांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER