हा टोमणा मला आहे का? ; सुप्रिया सुळेंचा अमोल कोल्हेंना गमतीशीर सवाल

Amol Kolhe - Supriya Sule Video

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले . यापार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे . कोरोना विषाणूचा फैलाव कमी करण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने करत आहेत. या कठीण परिस्थितीत नेतेमंडळी फेसबुक किंवा इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत . इंस्टाग्राम लाईव्हद्वारे खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यानी बुधवारी एकमेकांशी संवाद साधला . यादरम्यान दोघांनीही लॉकडाउनचा अनुभव शेयर केला . तसेच कोरोनाशी लढा देताना आपला कोणत्या उपयोजना केल्या पहिजे आणि आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतल्या पहिजे यावरही दोघांनी चर्चा केली.

लॉकडाउनला सुरवातीला आपल्याकडे गमतीने घेतले गेले. मी अमुक करेल, मी तमुक करेल, असे वेगवेगळे प्लॅन अनेकांनी आखले . अनेकांनी तर वजन कमी करण्याचाही प्लॅनही तयार केला असे,” असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी, “हा मला टोमणा आहे का?असे विचारले. त्यावर दोघेही हसू लागले.

बरोबर दोन महिन्यापूर्वी डॉ. कोल्हे आणि मी दिल्लीवरून मुंबईला परतलो, त्यावेळी आता दोन महिने पुन्हा आपल्याला दिल्लीला जाता येणार नाही, अस क्षणभरही वाटल नव्हत. लॉकडाउनचे हे दोन महिने किती लवकर गेले, हे समजलेही नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या .

लॉकडाउनच्या 57 दिवसांमध्ये आपण काय काय प्लॅन केला आणि त्यातील किती अमलात आणल, याचा प्रत्येकाने विचार केला, तरप्रत्येकाकडे त्याचे गमतीशीर उत्तर असेल. प्रत्येकाने नजरेने पाहिल्यास प्रत्येकाची एक स्टोरी तयार होईल,” असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले .

दोन महिने घरात राहणे, ही लहान मुलासाठी खूप अवघड गोष्ट आहे. माझी मुले मोठी आहेत, पण तुमची मुले लहान आहेत, त्याचा कसा होता?” अशी विचारणा सुळे यानी डॉ. कोल्हे यांना केली. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “या लाकडाउनमध्ये लहान मुलांकडून खूप शिकायला मिळाले. मी 560 स्केअर फुटाच्या वनबीएचके फ्लॅटमध्ये राहतो.या लॉकडाउनमध्ये माझा मुलगा कसलीही तक्रार न करता न कंटाळता खूष राहतो. चार वर्षाचा मुलगा या परिस्थितीत खूप राहू शकतो; तर आपण का राहू शकत नाही.”असे कोल्हे म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला