अमिताभचा चित्रपटही डब्यात जातो

Amitabh Bachchan

बॉलिवूडमध्ये (Bollywood) मोठ्या कलाकारांचे चित्रपट तयार होतात आणि प्रदर्शित होतात. कारण त्यांच्यामागे मोठा निर्माताही असतो. छोट्या कलाकारांचे चित्रपट कधी कधी पूर्णही होत नाहीत त्यामुळे प्रदर्शित होण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो. परंतु बॉलिवूडच्या इतिहासावर नजर टाकली तर अगदी अमिताभ बच्चनपासून (Amitabh Bachchan) अजय देवगन, अक्षयकुमार, शाहरुख, ऋतिक रोशनपर्यंत अनेक असे कलाकार आहेत ज्यांच्या चित्रपटाची घोषणा झाली, फोटोशूटही झाले पण चित्रपट पुढे आकारच घेऊ शकला नाही. या कलाकारांना त्यांच्या या अशा बंद झालेल्या चित्रपटांची सदोदित आठवण येत असते आणि कधी कधी ते सोशल मीडियावर याची माहितीही देतात. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या अशाच एका बंद पडलेल्या चित्रपटाची आठवण ताजी केली आहे.

अर्थात अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट असे आहेत ज्याचे फोटोशूट आणि मुहुर्तही झाले पण ते चित्रपट पुढे सरकू शकले नाही. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झालेले असताना आणि प्रेक्षक त्यांच्यावर प्रेम करीत असतानाही त्यांचे अनेक चित्रपट मुहुर्तानंतर विविध कारणांनी बंद पडलेले आहेत. बरे असेही नाही की, त्या चित्रपटांचे निर्माते असेच कोणीतरी होते. बंद पडलेले चित्रपट मोठ्या निर्मात्यांनीच सुरु केले होते. या सगळ्याची आठवण काढण्याचे कारण म्हणजे अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेला एक फोटो.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात आणि जुन्या आठवणी फोटोसह शेअर करीत असतात. नुकताच त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो खूप जुना असल्याचे अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहून जाणवते. या फोटोत अमिताभ यांनी ग्रे रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाची जीन्स आणि कमरेला पिस्तूल लावलेले आहे. अमिताभ अँग्री यँग मॅनच्या अवतारात दिसत आहेत. अमिताभने या फोटोसोबत लिहिले आहे, ‘एक चित्रपट जो तयार झाला नाही. यासाठी स्टायलिंग झाले, फोटो शूट झाले आणि शीर्षकही ठरले. परंतु हा चित्रपट कधीच बनला नाही. मात्र अमिताभ यांनी या चित्रपटाचे नाव किंवा निर्माता, दिग्दर्शक, सहकलाकारांची नावे दिलेली नसल्याने हा कोणता चित्रपट असावा याचा कयासही लावता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER