अमिताभ अजूनही विश्वसनीय ब्रॅन्ड, अक्षय दुसऱ्या क्रमांकावर

Amitabh Bachchan - Akshay Kumar

बॉलिवूड (Bollywood) कलाकारांच्या प्रशंसकांची संख्या कोट्यावधींच्या संख्येत असते. त्यामुळेच त्यांचे चांगले चित्रपट चालतात आणि या कलाकारांना जाहिरातीही मिळतात. मात्र कलाकारांना ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बनवण्यापूर्वी उत्पादक कंपन्या कलाकारांची जनमानसातील प्रतिमाही पाहतात. कधी कधी एखादा कलाकार हिट असतो पण जनतेच्या मनात त्याच्याविरोधातील भावना असेल तर ती उत्पादने विकली जात नाहीत. कलाकारांवर विश्वास ठेऊन ग्राहक त्यांनी जाहिराती केलेल्या उत्पादनांची खरेदी करतात. त्यामुळेच कलाकारांची जनतेतील विश्वसनीयता पडताळली जाते. याबाबत नुकताच यंदाचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला असून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सगळ्यात विश्वसनीय ब्रॅन्ड म्हणून समोर आला असून दुसऱ्या क्रमांकावर अक्षयकुमारला (Akshay Kumar) पसंती दिली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन ब्रँड्स (IIHB) कडून टियारा (TIARA) अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात बॉलिवूडमधील सर्व कलाकारांमध्ये सगळ्यात जास्त विश्वसनीय ब्रॅन्ड कोण याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी देशातील 180 कलाकारांची निवड करण्यात आली होती. यापैकी 69 सेलेब्रिटी बॉलिवूडचे, 67 कलाकार छोट्या पडद्यावरील आणि 37 सेलेब्रिटी हे खेळ आणि अन्य क्षेत्रातील होते. देशातील 23 शहरांमधील 60 हजार नागरिकांनी या मतदानात भाग घेतला होता. या अहवालात अमिताभ बच्चन 88.0 गुण मिळवून देशातील सगळ्यात विश्वसनीय ब्रॅन्ड म्हणून पुढे आला आहे. अक्षयकुमारने 86.6 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. नायिकांमध्ये दीपिका पादुकोण 82.8 गुणांनी प्रथम क्रमांकावर आहे.

छोट्या पडद्यावरील कलाकारांमध्ये कॉमेडियन कपिल शर्मा हैं पहिल्या क्रमांकावर असून त्याला 63.2 गुण मिळालेले आहेत. तर खेळाडूंमध्ये महेंद्र सिंह धोनी प्रथम क्रमांकावर असून त्याला 86.0 गुण मिळालेले आहेत. विश्वसनीय ब्रॅन्डच्या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER