वाधवान प्रकरणावरून पहिल्यांदाच अमिताभ गुप्तांनी सोडले मौन, दिले हे स्पष्टीकरण

Amitabh Gupta and Wadhwan Case.jpg

पुणे : गृह विभागात मुख्य सचिवपदी काम बघत असताना अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी डीएलएफ घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान बंधूंना (Wadhwan brothers) लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात विशेष ट्रीटमेंट दिली होती. आता यावर अमिताभ गुप्ता यांनी मौन सोडलं आहे.

वाधवान कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना अमिताभ गुप्ता यांनी पोलीस परवाना मिळवून दिला होता. या प्रकरणात विरोधकांकडून गुप्ता यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली असताना त्यांची पुण्याचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. वाधवान प्रकरण हे माझ्यासाठी फक्त एक इंन्सिडंट होता आणि तो आता संपला आहे, असं पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना सांगितलं आहे.

पोलीस आयुक्तालयातील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी पहिल्यांदाच वाधवान प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला. तसेच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना सर्वोतपरी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच पुणेकरांना विश्वासात घेऊनच शहरात पोलिसिंग करणार आहे. पोलीस आयुक्तपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर अमिताभ गुप्ता हे पहिल्यांदाच मीडीयासमोर आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER