अमिताभवर होणार शस्त्रक्रिया, ब्लॉगवरून दिली स्वतःच माहिती

अनेक सिनेमे रखडण्याची शक्यता

Amitabh Bachchan

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत बच्चन कुटुंबिय कसे कामाला लागले आहे त्याची माहिती दिली होती. तो स्वतः, पत्नी जया, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या कोणते सिनेमे करणार आहे याची माहितीही त्यांनी शल मीडियावर शेअर केली होती. या वयातही अमिताभ अॅक्टिव्ह असून त्यांच्याकडे अनेक सिनेमे आहेत. मात्र अमिताभचे वय आणि त्यांना झालेला आजार अध्ये मध्ये बळावत असतो. त्यामुळे त्यांना काही काळ शूटिंगपासून दूर राहावे लागते. मात्र बरे झाल्यावर ते लगेचच कामाला लागतात आणि शूटिंग पूर्ण करतात. मात्र यावेळी अमिताभ यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याने यातून ते किती दिवसात बरे होतात यावर त्यांच्या आगामी सिनेमांचे भविष्य अवलंबून आहे.

शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर आजारी असून, लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या पोस्टनंतर बॉलिवूड आणि त्यांच्या फॅन्समध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ते लवकर बरे व्हावेत म्हणून त्यांच्या फॅन्सनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. ‘कुली’च्या सेट अमिताभ यांच्या या पोस्टनंतर माहिती घेतली असता ते कोणत्याही इस्पितळात दाखल झालेले नसून सध्या घरीच असल्याचे समजले. मात्र लवकरच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या जवळच्यांनी दिली. मात्र शस्त्रक्रिया कशाची केली जाणार आहे त्याची माहिती मात्र मिळाली नाही.

अमिताभ यांचे आता लवकरच नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शत ‘झुंड’ आणि इमरान हाशमी (Imran Hashmi) सोबतचा ‘चेहरे’ हे दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. तसेच ते सध्या चार ते पाच सिनेमातही काम करीत आहेत. अमिताभच्या या पोस्टमुळे ज्या सिनेमात अमिताभ बच्चन काम करीत आहेत त्या निर्मात्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. अमिताभ बच्चन सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत यशराजच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात काम करीत आहेत. या सिनेमाचे एक शेड्यूल पूर्ण झाले असून आता लवकरच दुसरे शूटिंग शेड्यूल सुरु होणार आहे. याशिवाय अमिताभ अजय देवगणचे (Ajay Devgan) दिग्दर्शन असलेल्या ‘मेडे’ मध्येही महत्वाची भूमिका साकारीत आहेत. या सिनेमाचेही पहिले शेड्यूल नुकतेच पूर्ण झाले आहे. याशिवाय ‘आंखे 2’ आणि ‘तेरा यार हू मैं’ या दोन सिनेमांचेही यावर्षी शूटिंग सुरु होणार आहे.

मात्र आता अमिताभ बच्चन आजारी पडल्याने आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याने त्यांना किती दिवस आराम करावा लागणार आहे त्याबाबत अजून काहीही निश्चित माहिती नाही. त्यामुळे या सिनेमाच्या शूटिंगचे शेड्यूल कसे आखायचे असा प्रश्न निर्मात्यांपुढे पडला आहे. काही निर्मात्यांनी अमिताभविना शूटिंग करण्याचे ठरवले असून ते बरे झाल्यानंतर त्यांच्यावर सीन शूट करून ते नंतर जोडता येतील का याचा विचार सुरु केल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER