अमिताभ बच्चन उद्यापासून सुरु करणार ‘गुडबाय’ सिनेमाचे शूटिंग

Maharashtra Today

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कामाची यादी देत कोण कोणते सिनेेमे करीत आहेत ते सोशल मीडियावर (Social Media) जाहीर केले होते. या यादीत त्यांनी विकास बहल दिग्दर्शित सिनेमाची माहिती देऊन लवकरच या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याने शूटिंग शेड्यूल पुढे ढकलण्यात आले. शुक्रवारी अमिताभ बच्चन यांच्या या नव्या सिनेमाचा मुहुर्त करण्यात आला असून ते उद्यापासून म्हणजे ४ एप्रिलपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

अमिताभ बच्चन सध्या अजय देवगण (Ajay Devgan) द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित ‘मे-डे’ चे शूटिंग करीत आहेत. यासोबतच त्यांनी आता त्यांच्या या आगामी नव्या सिनेमाचे शूटिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या नव्या सिनेमाचे नाव ‘गुडबाय’ असे असून याची निर्मिती एकता कपूरची (Ekta Kapoor) बालाजी टेलीफिल्म्स आणि रिलायंस एंटरटेनमेंट (Reliance Entertainment) करीत आहेत. याचे दिग्दर्शन विकास बहल (Vikas Bahl) करीत आहे. या सिनेमात अमिताभसोबत साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) काम करताना दिसणार आहे. शुक्रवारी या सिनेमाचा मुंबईत मुहुर्त करून सिनेमाचे शूटिंगही सुरु करण्यात आले. रश्मिकाने मुहुर्तासोबतच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. एकता कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुहुर्ताची माहिती दिली आहे, एकताने सोशल मीडिया अकाउंटवर क्लॅप बोर्ड आणि मुहुर्ताचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत एकताने लिहिले आहे, ‘एकाच अभिनेत्याबरोबर काम करण्याची इच्छा होती आणि ती इच्छा आता पूर्ण होत आहे. या अभिनेत्यासोबत लहानपणीच्या अनेक आठवणी आहेत. अमिताभ बच्चन, नव्या सुरुवातीसाठी तुमचे खूप खूप स्वागत अंकल/सर.’ एकता कपूरने ती लहान असताना अमिताभ बच्चन यांच्यासोबत काढलेला एक ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोही शेअर केला आहे.

रश्मिकाने शूटिंगला सुरुवात केली असली तरी अमिताभ बच्चन उद्यापासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. एकता कपूर आणि विकास बहलने यापूर्वी ‘लुटेरा’ आणि ‘उडता पंजाब’ सिनेमाची निर्मिती केली होती आणि आता गुडबायसाठी हे पुन्हा एकत्र आले आहेत. एकताने गुडबायबाबत बोलताना सांगितले, “गुडबाय एक विशेष विषय असून यात इमोशन आणि एंटरटेनमेंटचा ताळमेळ घालण्यात आलेला आहे. ही एक अशी कथा आहे जी संपूर्ण परिवाराला आवडेल.” रिलायंस एंटरटेनमेंटचे ग्रुप सीईओ शिबाशीष सरकारने सिनेमाबाबत बोलताना सांगितले, “हा सिनेमा त्याच्या नावाप्रमाणेच मनोरंजक आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदानाला आमच्या टीममध्ये घेताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button