अमिताभ बच्चन यांना अजय देवगन करणार दिग्दर्शित

Ajay Devgan & Amitabh Bacchan

‘हिंदुस्तान की कसम’, ‘मेजर साब’, ‘खाकी’ आणि ‘सत्याग्रह’ चित्रपटात एकत्र काम केलेले अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgan) पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अजय देवगणच या नव्या चित्रपटाची निर्मिती करणार असून विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शनही अजय देवगणच करणार आहे. अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शित करण्याचे स्वप्न अनेक दिग्दर्शक पाहात असतात. अजयच्या वडिलांनी म्हणजे वीरू देवगण यांनी 1999 मध्ये अमिताभ बच्चनला हिंदुस्तान की कसम चित्रपटात दिग्दर्शित केले होते. या चित्रपटात अजय देवगणसोबत मनिषा कोईराला आणि सुष्मिता सेन यांनीही भूमिका साकारल्या होत्या. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आता अजय देवगणही अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शित करणार आहे. अमिताभला दिग्दर्शित करण्याची संधी मिळाल्याने तो खूपच आनंदी आहे. अजय देवगण निर्माण करीत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘मे डे’ असे ठेवण्यात आलेले आहे. अजय देवगण या चित्रपटात एका पायलटची भूमिका साकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र अमिताभ बच्चनची भूमिका मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरपासून हैदराबाद येथे सुरु केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER