अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या डोळ्याचेही झाले ऑपरेशन

Amitabh Bachchan

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत लवकर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होणार असून ऑपरेशन होणार आहे असे सांगितले होते. त्यांच्या या पोस्टनंतर अमिताभना काय झाले असावे आणि कसले ऑपरेशन होणार आहे असा प्रश्न त्याच्या फॅन्सच्या आणि तो काम करीत असलेल्या सिनेमांचे निर्माते आणि दिग्दर्शकांना पडला होता. मात्र लगेचच एक-दोन दिवसांनी अमिताभ यांनी डोळ्यात मोतीबिंदू झाला होता आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन यशस्वी झाले असल्याचे कळवले होते. एवढेच नव्हे तर ऑपरेशनपूर्वी आणि आता कसे दिसत आहे तेसुद्धा सोशल मीडियावर सांगितले होते. आता पुन्हा एकदा अमिताभ यांनी त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावर ऑपरेशन झाल्याची माहिती दिली आहे.

मोतीबिंदूमुळे अमिताभ यांना सर्व काही डबल दिसू लागले होते. त्यामुळेच त्यांनी सिनेमाचे शूटिंगही न करण्याचा निर्णय घेतला होता. अजय देवगण दिग्दर्शित आणि अभिनीत ‘मे डे’ आणि रणबीर कपूर, आलिया अभिनीत ‘ब्रह्मास्त्र’मध्ये अमिताभ सध्या काम करीत आहेत. याशिवाय गोल्डी बहलच्या नव्या सिनेमाचे शूटिंगही त्यांना सुरु करायचे होते. या सिनेमांचे शूटिंग शेड्यूल निर्मात्यांना पुढे ढकलावे लागले आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती देताना सोशल मिडियावर लिहिले आहे, आणि हे दुसरे ऑपरेशनही यशस्वी झाले. आता रिकव्हर होत आहे. सर्व काही ठीक आहे. मॉर्डन मेड‍िकल टेक्निक आणि डॉ.एच.एम. यांच्या हाताची करामात. जीवन बदलवणारा हा अनुभव आहे. आता तुम्ही ते पाहू शकता जे पूर्वी पाहू शकत नव्हता. खरोखरच. अप्रतिम जग.’ याशिवाय त्यांनी ब्लॉगवर त्यांच्या फॅन्सचेही आभार मानले आहेत. अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ सिनेमा ३० एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात इमरान हाशमीही आहे, त्यानंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ १८ जूनला रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER