केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितली लग्नापूर्वीची कहाणी

Amitabh Bachchan

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सध्या ‘कौन बनेगा करोड़पति’ (KBC) या शोमध्ये व्यस्त आहेत. पूर्वी या शोमध्ये भाग घेतलेले दोन स्पर्धक कोट्यधीश झाले. जेव्हा जेव्हा अमिताभ हॉट सीटवर स्पर्धकासमोर बसतात तेव्हा ते त्यास आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित बर्‍याच गोष्टी लोकांशी शेअर करतात. नुकतेच बिग बीने सांगितले की, लग्नाआधी ते जया बच्चन यांना प्रेमपत्र लिहीत असत.

खरं तर केबीसीमध्ये पोहचलेल्या एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना लग्नाआधी जया बच्चन यांना प्रेमपत्र लिहिले आहे किंवा सरळ जाऊन सांगितले की, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे विचारले. हे ऐकून अमिताभ हसू लागले आणि मग त्यांनी प्रत्युत्तर दिले.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की,  लग्नाआधी जया बच्चन (Jaya Bachchan) यांना  बरीच प्रेमपत्रे  लिहिली आहेत. याशिवाय त्यांनी तो किस्सादेखील सांगितला जेव्हा वडिलांच्या सांगण्यावरून जयाशी लग्न करावे लागले.

पुढचा चित्रपट हिट ठरला तर  मित्रांसह परदेशात जाईन, असे ठरवले असल्याचे अमिताभ यांनी सांगितले. त्यांचा चित्रपट हिट ठरला आणि मग त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. या ट्रिपमध्ये जया बच्चनही त्यांच्यासोबत जाणार होत्या.

अमिताभ यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला सांगितले की, जर तुला ही मुलगी आपल्याबरोब  परदेशी घेऊन जायची असेल तर प्रथम तुला तिच्याशी लग्न करावे लागेल. आणि अशा प्रकारे अमिताभ बच्चन आणि जयाचे लग्न झाले.

ही बातमी पण वाचा : जेव्हा जया बच्चनच्या उद्गारांवर ऐश्वर्याच्या डोळ्यात आले होते पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER