
मुंबई :- केंद्र सरकारने शेतक-यावर लादलेले कृषी कायदे यावरून देशातील तापलेले वातारण अद्याप शमलेले नाही. यावर अभिनेत्यांचे ट्विटरवार सुरू असतानाच आता यामध्ये कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही ट्विटरवरून बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. तर, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या अभिनेत्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत व कॅनडाचा नागरिक असलेला अक्षय कुमारला देशातील प्रश्नांवर बोलण्याचा अधिकार नाही असे राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटले आहे.
अमिताभ बच्चन यांना मेमरी लॉस झाला आहे का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. या लोकांनी राजकारणात हात घालायला नको, असं मतही आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना लाचारी करावी लागते हे दुर्दैवं असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्याबाबत काँग्रेसनं ही भूमिका असल्याचं आपल्याला माहिती नाही असे आव्हाड म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला