अमिताभ बच्चनने ‘या’ राजकीय नेत्याचा केला होता ‘पोलिटिकल गेम’ !

मुरलेल्या राजकारण्यांचं खतरनाक राजकारण आपण बघत असतो, पण ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है’ म्हणत बॉलीवूडच्या शहेनशहाने एका राजकीय नेत्याचं करियरच संपवून टाकलं राव ! काय ? कसं ?

त्याचं झालं काय हेमवती नंदन बहुगुणा हे कॉंग्रेसमधलं मोठं नाव होतं. म्हणजे कॉंग्रेसची राष्ट्रीय लेवलची जी माणसं होती त्यांच्यातल्याही महत्वाच्या व्यक्तींपैकी बहुगुणा एक होते. उत्तरप्रदेश विधानसभेची पहिली निवडणुक बहुगुणांनी लढवली आणि निवडून आले. पुढे 1973 ते 1975दरम्यान ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते.

हमवती नंदन बहुगुणा हे उत्तर प्रदेशच नव्हे तर भारतीय राजकार्णातील मोठं प्रस्थ होतं. सगळं ठीक चाललं होतं, पण इंदिरा गांधींशी मतभेद झाले आणि बहुगुणांनी कॉंग्रेस सोडली. बहुगुणांनी फक्त कॉंग्रेस सोडलीच नाही तर कॉंग्रेस संपवण्याची प्रतिज्ञाच त्यांनी घेतली.

कॉंग्रेस सोडून बहुगुणा जनता पक्षात गेले. त्यांनंतर समाजवादी पक्षातही ते काही दिवस होते. नंतर त्यांनी स्वतःचा लोकशाही समाजवादी पक्ष ही सुरू केला होता.

महत्वाचा किस्सा झाला 1984 मध्ये. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसची सूत्र राजीव गांधींच्या हातात गेली होती. विधानसभेच्या निवडणूका घोषित झाल्या होत्या. हेमवती नंदन बहुगुणा हे आता कॉंग्रेसचे उत्तरप्रदेशातले मोठे विरोधक होते.

कॉंग्रेसने बहुगुणांविरोधात अमिताभ बच्चनला उमेदवारी दिली. खरी मजा आली अमिताभचं नाव घोषित झाल्यानंतर ! बहुगुणांनी फिल्मी अंदाजात अमिताभविरोधात प्रचार करायला सुरुवात केली.

अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला. सर्वसामान्यांचा कैवारी अशी त्याची भारतातील जनतेत असणाऱ्या फिल्मी प्रतिमेच्या बळावर त्याचा निवडणुकीत करिष्मा दिसू लागला.
आता फिल्मी अंदाजात म्हणजे कशी ?

तर बहुगुणांनी प्रचारात काही डायलॉग मारत अमिताभवर आणि कॉंग्रेसवर हल्ला चढवला.

“दम नहीं है पंजे में लंबू फंसा शिकंजे में”
“सरल नहीं संसद में आना, मारो ठुमका गाओ गाना”

असे डायलॉग मारत प्रचार करत बहुगुणांनी प्रचार केला असला तरीही बहुगुणांना काही विशेष फायदा होऊ शकला नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेससाठी सहानभूतीची लाट तयार झाली होती.शिवाय अमिताभची लोकप्रियता प्रचंड होती. अमिताभ आणि जया बच्चन दोघही जोरदार प्रचारात उतरले होते.

”अमिताभला मत देऊन, उत्तरप्रदेशच्या सुनेला आशीर्वाद द्या” असा प्रचार जया बच्चन यांनी सुरू केला होता. प्रत्येकाचा आयकॉन असलेल्या अमिताभला बहुगुणा रोखू शकले नाहीत.

आयकॉन अमिताभ बहुगुणांवर वरचढ ठरला. त्या निवडणुकीत अमिताभने बहुगुणांना 1 लाख 87 हजार मतांच्या फरकाने पाडलं.

हा पराभव बहुगुणांच्या फारच जिव्हारी लागला आणि त्यांनी राजकरणातून संन्यास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER