अमिताभ बच्चन यांनी अजय देवगणला डार्क हॉर्स म्हणून गौरवले होते

Maharashtra Today

बॉलिवूडमध्ये नायक म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर चिकना चुपडा चेहरा लागतो. लव्हर बॉयचा चेहरा आणि अॅक्शन असे कॉम्बिनेशन असेल तर तो नायक हिट होतो. मात्र असेही काही नायक आहेत ज्यांच्याकडे चिकना चुपडा चेहरा नसतानाही त्यांनी बॉलिवूडमध्ये यश मिळवले आहे. अर्थात ही गोष्ट गेल्या दोन-तीन दशकातील आहे. अनेक असे नायक आले ज्यांना चेहरा नसतानाही त्यांनी बॉलिवूडमध्ये चांगले यश मिळवले. अशाच नायकांपैकी एक नायक आहे अजय देवगण. (Ajay Devgan). अजय देवगणने जेव्हा करिअरला सुरुवात केली तेव्हा त्याला कोणीही गंभीरतेने घेत नव्हते. पण फक्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अजय देवगणला डार्क हॉर्स म्हणून गौरवले होते. आणि अमिताभ बच्चन यांचा हाच विश्वास अजय देवगणने खरा करून दाखवला होता. आज अजय देवगणचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने ही गोष्ट आठवली.

अजय देवगणचा जन्म २ एप्रिल १९६९ ला झाला. बॉलिवूडमधील प्रख्यात स्टंट कोरियोग्राफर आणि अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगन (Veeru Devgan) यांचा अजय हा मुलगा. अजयचे खरे नाव विशाल असल्याची माहिती फार कमी लोकांना ठाऊक आहे. अजयचे खरे नाव अजय देवगणसाठी वीरू देवगण यांनी १९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ सिनेमाची निर्मिती केली होती. पहिल्याच सिनेमाच्या वेळी अजय देवगणने यश चोप्रांच्या मल्टीस्टारर ‘लम्हे’शी टक्कर घेतली होती आणि प्रचंड यश मिळवले होते. मात्र पहिला सिनेमा सुपरहिट झाला असला तरी त्याला निर्माते गंभीरतेने घेत नसत. अजय डोळे अत्यंत बोलके असल्याचे महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी सांगितले होते तर एकदा बोलताना अमिताभ बच्चन यांनी अजय हा डार्क हॉर्स असून हा नक्कीच यशस्वी होईल असे म्हटले होते. महेश भट्ट यांचे अजयच्या डोळ्यांबाबतचे वक्तव्य आणि अमिताभ बच्चन यांचा अजयवर असलेला विश्वास पुढे खरा ठरल्याचे दिसून आले. अजयने नंतर ‘दिलवाले’, ‘सुहाग’, ‘नाजायज’, ‘दिलजले’, ‘इश्क’, ‘दृश्यम’, ‘दे दे प्यार दे’, ‘अॅक्शन’ जॅक्सन’, ‘सिंघम’ आणि ‘गोलमाल’ सीरीज असे बॉक्स ऑफिस हिट सिनेमे तर दिलेच महेश भट्टच्या १९८८ मध्ये आलेल्या ‘जख्म’ सिनेमात अजयने अभिनयाचा दर्जा दाखवला होता आणि त्यामुळेच त्याला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला होता. त्यानंतर अजय देवगणला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार ‘द लिजंड ऑफ भगत सिंह’ सिनेमासाठी मिळाला होता. या सिनेमात अजय देवगणने शहीद भगत सिंह यांची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे साकारली होती.

महेश भट्टने प्रशंसा केलेल्या अजय देवगणच्या डोळ्यांवरच काजोल (Kajol) भाळली होती. स्वतः काजोलनेच ही गोष्ट सांगितली होती. या दोघांची पहिली भेट १९९५ मध्ये आलेल्या हलचल सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात रुपांतरित झाली. जवळ जवळ पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर १९९९ मध्ये या दोघांनी लग्न केले. आज अजय-काजोलला दोन मुले असून दोघांचा संसार २२ वर्षानंतरही सुरळीत सुरु आहे.

अजय देवगणला वाढदिवसानिमित्त आमच्या खूप खूप शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button