अमिताभ बच्चन यांनी केली अवयवदानाची (Organ Donor) घोषणा; चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Amitabh Bachchan

अमिताभ यांच्या ट्विटला उत्तर म्हणून, अनेकांनी अवयवदान केल्यानंतर मिळालेली स्वतःची प्रमाणपत्रे शेअर केली आहेत आणि त्यांनीही अवयवदान कसे केले हे सांगितले आहे.

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अनेकदा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा देशातील इतर अडचणींच्या वेळी देणगी देत राहिले आहेत. त्यांनी दुष्काळ किंवा पूरग्रस्तांसाठी अनेकदा कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे. तथापि, यावेळी अमिताभ यांनी अवयव दान करण्याची घोषणा केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून याची घोषणा केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करुन याची घोषणा केली आहे. त्यांनी आपला फोटो पोस्ट केला असून त्यांच्या कोटवर हिरव्या रंगाचा रिबन आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले की, “मी शपथ घेतलेला एक अवयव दाता आहे. त्याच्या पवित्रतेसाठी मी हिरवा रंगाचा रिबन घातला आहे.”

अमिताभ यांच्या ट्विटला उत्तर म्हणून, अनेकांनी डोनेट केल्यानंतर मिळालेली प्रमाणपत्रे शेअर केली आहेत आणि त्यांनीही अवयव दान कसे केले हे सांगितले आहे. त्याच वेळी, असे काही लोक आहेत जे अमिताभ यांच्या प्रभावामुळे अवयव दान करण्यास तयार झाले आहेत. दरम्यान, एका युजरने ट्विट करून म्हटले आहे की, अमिताभ यांच्या अवयवांचे प्रत्येकाला ट्रांसप्लांट करता येणार नाही.

युजरने लिहिले, “सर, तुम्हाला हेपेटायटीस-बी झाला होता. तुमचे अवयव इतर कोणत्याही व्यक्तीस लागू होऊ शकत नाहीत. तसेच तुमचे यकृत (Liver) प्रत्यारोपण करून रोगप्रतिबंधक औषधदेखील घेतात. मी अवयव दान करतो आणि इतरांचे प्राण वाचवितो. मी आपल्या निर्णयाचे कौतुक करतो; पण मला खेद आहे की, आपण वैज्ञानिकरीत्या अवयव दान करू शकत नाही.”

KBCमध्ये हा बदल प्रथमच घडला

अमिताभ यांनी अलीकडेच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. ते ‘कौन बनेगा करोडपती सीझन- १२’ होस्ट करीत आहेत. या कार्यक्रमाबद्दल उत्साह आणि जोश दरवर्षीसारखा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे; परंतु दरवर्षीप्रमाणे या वर्षी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये प्रेक्षक कोविडमुळे दिसत नाही आहे. याशिवाय ऑडियन्स पोल, लाईफलाईनही काढून टाकण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER