चिमुकलीच्या धमाल नाचाचा धुमाकूळ, अमिताभ बच्चन यांनीही केले कौतुक

Amitabh Bacchan

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती हरियाणी गाण्यावर छान नाचते. नाचात भरपूर उत्साह आहे. अडीच मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. अमिताभ बच्चनने या चिमुकलीचे कौतुक करून व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन लिहितात, ‘…शो मस्ट गो ऑन!’ चिमुकली नाचण्यात एवढी रंगली आहे की, चप्पल पायातून निघाली, तरी नाचतेच आहे. नाचताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, कंबरेचे ठुमके याचे अमिताभ बच्चन यांनी तिचे कौतुक केले आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. व्हिडीओ अजूनही व्हायरल आहे आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंग करतो आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. बरेचवेळा चाहत्यांना प्रोत्साहितही करतात. कोणी चांगले काम करत असेल, तर अमिताभ बच्चन स्वत: सोशल मीडियावर शेअर करतात.

एखाद्या चाहत्याने चांगला व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला की अमिताभ बच्चन त्यांचे कौतुक करतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ती अतिशय मधुर आवाजात गात होती. त्याही व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात व्यस्त आहेत. या शो व्यतिरिक्त, अमिताभ ‘पृथ्वीराज’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER