अमिताभ , अभिषेक बच्चन उपचारांना चांगला प्रतिसाद

Abhishek Bachhan & Amitab Bachhan

मुंबई : अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)व अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)हे उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. ११ जुलै रोजी या दोघांना कोरोनाची(Corona) लागण झाल्याची माहिती समोर आली.

मुंबईतील नानावटी रुग्णालयांना त्यांना दाखल करण्यात आले . नानावटी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असून पुढील सात दिवस तरी त्यांना रुग्णालयातच राहावे लागणार आहे. दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी सात दिवस तरी रुग्णालयात राहावे लागणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाने एका वृत्तसंस्थेला दिली . ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan) व आठ वर्षीय आराध्या(Aradhya) यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच . कुटुंब आणि स्टाफ मधील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्यामुळे मुंबई महापालिकेने रविवारी ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे त्यांचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून टाळेबंद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER