‘आपल्या शुभेच्छांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली’, अमित ठाकरेंची भावनिक पोस्ट

Amit Thackeray - Maharastra Today
Amit Thackeray - Maharastra Today

मुंबई : मनसे नेते अमित राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची बाधा झाली होती. पण आता ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. घरी परतल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून सर्वांप्रति आभार व्यक्त केले आहे. शुभेच्छांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, याचा अनुभव मी नुकताच घेतला असे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मी हॉस्पिटलमधून घरी परतलोय आणि माझी तब्येत चांगली आहे. दक्षता म्हणून पुढचा एक आठवडा होम क्वारंटाईन असेन असे ते म्हणाले.

अमित ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहले आहे की, ‘शुभेच्छांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, याचा अनुभव मी नुकताच घेतला. मी हॉस्पिटलमधून घरी परतलोय आणि माझी तब्येत चांगली आहे. दक्षता म्हणून पुढचा एक आठवडा ‘होम क्वारंटाइन’ म्हणजे घरातच असेन. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार. तुम्ही सर्वांनीही काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.’ सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button