अमित ठाकरेंचे मिशन नागपूर, खाजगी दौऱ्यातही निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा

Amit Thackeray

नागपूर : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घेतला. या निवडणुकीत काही ग्रामपंचायतींवर मनसेचे(MNS) सदस्य निवडूनही आले. आता मात्र मनसेने राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकींवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांसाठी राज ठाकरे यांनी पुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी मिळताच अमित ठाकरेही ऍक्शन मोडवर(Action Mode) आले आहेत. पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. मुख्य म्हणजे खाजगी दौऱ्यावर असतानाही ते आता वेळात वेळ काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

शनिवारी रात्री अमित ठाकरे हे खाजगी कामानिमित्त नागपुरात आले असता त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. २०२२ च्या सुरुवातील नागपूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासूनच कामाला लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी त्यांनी नागपुरातील महापालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार देण्यावर चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच उमेदवारांची चाचपणी करण्याची सूचना अमित ठाकरेंनी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता नागपूर महापालिकेत मनसेची उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER