अत्यंत महत्वाच्या मागणीसाठी अमित ठाकरेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Amit Thackeray-CM Uddhav Thackeray

मुंबई :- कोरोनाच्या संकट काळात राज्यातील सर्व पत्रकार, कॅमेरामन (Journalist-cameraman) यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरेही (Amit Thackeray) पत्रकारांसाठी मैदानात उतरले आहे. त्यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करुन त्यांना कोविड लसीकरण आणि इतर सुविधा देण्याची मागणी केली आहे.

अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी हे पत्र मी आपणास लिहित आहे. करोना महासाथी विरोधात सुरु असलेल्या लढाईत राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस यांप्रमाणे आपले पत्रकार बांधवही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. करोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीला अत्यंत निधड्या छातीने पत्रकार बांधव सामोरे जात आहेत आणि वार्ताकनाचं आपलं काम अविरतपणे करत आहेत. त्यांच्यामुळेच या कठीण काळात राज्यभरातल्या ठिकठिकाणची वास्तव स्थिती बातम्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. दुर्दैवाने, वार्तांकनाचं हे काम करताना अनेक पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांना करोनाची लागण होऊन त्यामुळे त्यांपैकी काहींना आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना आपले प्राणी गमवावे लागले आहेत.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तसंच वार्ताकनाचं आपलं काम पत्रकार बांधवांना निर्धोकपणे करता यावं यासाठी त्यांचा समावेश ‘फ्रंटलाईन वर्कर्स’च्या यादीत करण्यात येवून त्यांना संबंधित सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात आणि त्यांचे प्राधान्याने कोविड-१९ लसीकरण करण्यात यावे, ही आमची आग्रहाची मागणी आहे. पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांचे लसीकरण करण्यासाठी आपण जिल्हा तसंच तालुका पातळीवरील त्यांच्या संघटनांना विश्वासात घ्यावे, अशी विनंतीही अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

ही बातमी पण वाचा : पत्रकारांसाठी अमित ठाकरे मैदानात, अग्रणी योद्धे घोषित करण्यासाठी पाठपुरवठा करणार

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button