PHOTOS : अजून एका ‘ठाकरे’ची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आणि पुत्र अमित ठाकरे यांचे राजकीय लॉंचिंगसुद्धा यावेळी करण्यात आले. अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली, अशी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घोषणा केली. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड होताच शिक्षण ठराव मांडला. मनसे भविष्यात अमित ठाकरेंच्या नेतृत्वात ‘शिक्षण परिषदेचे’ आयोजन करणार आहे.