अमित ठाकरे यांचे कोरोनावरुन मेसेज व्हायरल करणाऱ्यांना आवाहन

Amit Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट  (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी एक सर्वाना हात जोडून एक कळकळीची विनंती आहे, आपल्या व्हाट्सआप, फेसबुकवर ‘कृपया’ मरणाच्या बातम्या, स्मशानातील फोटो, व्हिडीओ, शवागरातील मृतदेहांचा खच असलेले फोटो, व्हिडीओ कृपा करून शेअर करू नका, तुम्हाला आले तर ते एक तर तुमच्याकडेच ठेवा अन्यथा डिलीट करा, पण व्हायरल करून लोकांच्या मनातील भीती आणखी वाढवू नका, असे आवाहन केले आहे.

त्याचबरोबर जर काही व्हायरल करायचेच असेल तर काही आश्वासक, आत्मविश्वास आणि सकारात्मक असे काही तरी व्हायरल करा कारण या सततच्या ‘कोव्हीड’ आणि त्याच्या भडक, ठळक बातम्यांनी लोके आधीच खचली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button