अमित ठाकरे संयमाने उत्तम प्रकारचे काम करतील : बाळा नांदगावकर

मुंबई : मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे अमित ठाकरे (Amit Thackeray ) यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली असून लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सांगितलं आहे. मतदारसंघातील मनपा वॉर्डची संपूर्ण जबाबदारी या समितीवर असणार आहे.

याबाबत बोलताना नांदगावकर म्हणाले की, अमित ठाकरे उत्तम प्रकारचं काम करू शकतील, असा आमचा दृढ विश्वास आहे. अमित ठाकरे संयमाने सर्व काम करू शकतात. म्हणूनच राज ठाकरेंनी इतर नेत्यांप्रमाणे त्यांच्यावरही जबाबदारी दिली आहे. प्रत्येक शाखेत जे वास्तव आहे ते राज ठाकरेंना अहवालातून सादर करण्यात येणार आहे. जी परिस्थिती आहे ती त्यांच्यासमोर मांडायची आहे. मुंबईपासून सुरुवात केली असून नंतर ठाणे, पुणे, नाशिक येथे जाऊ, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान डोंबिवलीतील घडामोडींवर बैठकीत चर्चा झाली की नाही विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, त्यावर काही चर्चा झाली नाही. तो विषय संपला आहे, आता पुढे काय करायचं यावर चर्चा झाली.

ही बातमी पण वाचा :‘एक आहे पण नेक आहे ; मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटलांच्या समर्थनार्थ बाळा नांदगावकर यांची बेधडक पोस्ट 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER