पत्रकारांसाठी अमित ठाकरे मैदानात, अग्रणी योद्धे घोषित करण्यासाठी पाठपुरवठा करणार

Amit-Thackeray

मुंबई : कोरोनाच्या (Corona) संकट काळात राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. आजच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे. आता त्यांच्यानंतर महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमित ठाकरेही (Amit Thackeray) पत्रकारांसाठी मैदानात उतरले आहे.

“कोरोना काळात जीवाची बाजी लावून आपल्यापर्यंत माहिती पोहचविणारे पत्रकारही अग्रणी योद्धेच आहेत. राज्य सरकारने पत्रकारांनाही अग्रणी योद्धे घोषित करावं या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करणार असल्याची घोषणा अमित ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. तसेच अमित ठाकरे यांनी आज ठाणे येथील मनसे मदत कक्षाला भेट दिली व दिवस रात्र काम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button