अमित ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या भेटीला, आरोग्य विभागासाठी केल्या या मागण्या

Rajesh Tope - Amit Thackeray

राज्यातील करोना परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबई आणि इतर काही शहरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच रुग्णांची हेळसांड होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. राज्यातील आरोग्य सेवेविषयी असलेल्या प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या.


या भेटीत-

१. करोना व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी ह्यासाठी एक अॅप विकसित करावं.

२. बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि बंधपत्रित अधिपरिचारिका यांच्या पगारातील कपात रद्द करुन त्यांचा पगार पूर्ववत करावा.

३. प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन द्यायलाच हवी.

४. प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचा-यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत आणि त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला