नवी मुंबई पालिकेसाठी मनसे मैदानात ; अमित ठाकरेंच्या हस्ते तीन शाखांचे उद्घाटन

Amit-Thackeray

मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे . निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी मनसेही आता मैदानात उतरले आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांचे चिरंजाव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांनी अमित यांना पालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .

अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि आमदार राजू पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत. 30 ते 35 गाड्यांच्या ताफ्यासह अमित ठाकरे वाशी टोल नाक्यावर आले. या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा ताफा बेलापूरकडे रवाना झाला. दुपारी 3 वाजता अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन होणार आहे. पण अमित ठाकरे पावणे बारा वाजताच नवी मुंबईत दाखल झाले आहेत .

अमित ठाकरे सुमारे तीन तास नवी मुंबईत थांबतील. त्यानंतर तिन्ही शाखांचे उद्धाटन करतील. या तीन तासात ते नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नवी मुंबईतील राजकीय वातावरण, मनसेची तयारी, मनसेचे संभाव्य उमेदवार, पक्षात येऊ शकणारे इतर पक्षाचे पदाधिकारी किंवा नगरसेवक आणि निवडणुकीची मोर्चेबांधणी आदी बाबींवर ते चर्चा करतील .

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकारचा निर्णय: राज ठाकरेंची झेड सुरक्षा हटवली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER