मुंबई जिंकणार ; मनसेची जोरदार मोर्चेबांधणी ,अमित ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली बैठकांचे सत्र सुरु

मुंबई : ज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी (municipal elections) महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे . राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या उपस्थितीत सध्या पक्षाच्या बैठका पार पडत आहेत. यामध्ये मनसेने महानगरपालिकेच्या निवडणुका स्वत:च्याच बळावर लढवाव्यात असा कार्यकत्यांचा सुर आहे .

नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. आम्ही महापालिकेच्या बैठकांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आम्ही विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेत आहोत. अमित ठाकरे स्वतः सगळ्या बैठकांना हजर असतात. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

अमित ठाकरे यांच्यावर सध्या लोकसभेच्या एका जागेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि तरुणांमध्ये त्यांची इतकी क्रेझ आहे की, ते एका मतदारसंघापुरते मर्यादित राहणार नाहीत. आगामी काळात अमित ठाकरे यांचा प्रभाव सर्वच महानगरपालिकांमध्ये दिसून येईल, असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला.

या बैठकांमध्ये मनसेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा सूर उमटताना दिसत आहे. पालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागांवर स्वतंत्रपणे लढावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कार्यकर्त्यांची ही भावना राजसाहेबांपर्यंत पोहोचवू. पण अंतिम निर्णय तेच घेतील, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER