अमित ठाकरेंनी हाकली बैलगाडी !

पुणे : खेड तालुक्यातील सावरदरी गावात अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) कार्यालयाचे उद्घाटन केले. त्या वेळी त्यांनी बैलगाडी हाकली! यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आला.

अमित यांनी जन्स – शर्ट सोबत डोक्यावर पांढरी टोपी घातली होती. यावरून, एका भाषणात अमित म्हणाले होते की मला जीन्स आणि टी घालून ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी बघायचा आहे, याची आठवण झाली. बैलगाडीवर मनसेचे झेंडे लावले होते आणि जू वर भगवा कपडा टाकला होता.

मुंबई मनपाच्या निवडणुकीत अमित यांच्यावर उत्तर-पूर्व विभागाची जबाबदारी आहे. त्यांचा हा दौरा याच अनुषंगाने होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER