अमित ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वॉरंटाईन

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना लीलावतीत दाखल करण्यात आले होते. आता त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

अमित ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना २० एप्रिल रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने त्यांना चार दिवसांतच डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना १४ दिवस घरीच क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button