अमित ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

Lilavati Hospital - Amit Thackeray

मुंबई : राजपुत्र आणि मनसेचे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. अमित ठाकरे यांना ताप आल्यामुळे खबरदारी म्हणून ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

अमित ठाकरे यांना दोन दिवसांपासून ताप येत आहे. त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. याशिवाय त्यांची मलेरिया टेस्ट करण्यात आली, ती सुद्धा निगेटिव्ह आली आहे.

अमित ठाकरे कोरोना काळात गेल्या काही दिवसांपासून सक3ीयपणे ग्राऊंडमध्ये उतरून काम करताना दिसत आहेत. अनेक समस्यांना घेऊन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्रव्यवहार केला आहे. तसेच, आरे कारशेड कांजुरमार्गला हलवल्याने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडून कौतुक करण्यात आले होते.

आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे, अशी भूमिका त्यावेळी अमित ठाकरे यांनी घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER