अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचे असेल तर येईल- चंद्रकांत पाटील

Amit Shah - Chandrakant Patil

पुणे :- वैभववाडीतील सहा  नगरसेवक गेले त्याचा अमितभाईंच्या पायगुणाचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात भाजपचे सरकार यायचे असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही, असं भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे (Girish Prabhune) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची पिंपरी-चिंचवडमध्ये सदिच्छा भेट घेतली.

त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. खरं बोलले की शिवसेनेला (Shiv Sena) झोंबते, अमित शहा (Amit Shah) खरं बोलले ते त्यांना फार झोंबले.  त्यामुळे ज्याला ज्याला जसं जमलं ज्यांनी माईल्ड प्रतिक्रिया काढली, त्यांना दम दिला गेला. दुसऱ्या दिवशी त्याच माणसाने पुन्हा स्ट्रॉंग प्रतिक्रिया द्यायची, त्यामुळे अमित शहा  शिवसेनेबद्दल जे बोलले ते खरे होते. त्यामुळेच ते झोंबले. सिंधुदुर्गातील नगरसेवक शिवसेनेत जाणे आणि अमित शहा  यांचे वक्तव्य याचा कसलाही संबंध नाही, अमित शहांच्या पायगुणाने सरकार जाणार असेल ते जाईल.  अमित शहा  यांनी शिवसेना संपण्याची भाषा केली नाही; पण मागच्या १५ महिन्यांत  ज्या पद्धतीने सरकारचा कारभार चालला आहे, तो आमच्या सरकार वेळी राहिला असता, तर शिवसेना संपली असती, असं वक्तव्य त्यांनी केले आणि ही वस्तुस्तिथी असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेला आणि संजय राऊतांना (Sanjay Raut) पराचा कावळा करण्याची सवय आहे. भाजपला कुणाला घाबरण्याचे कारण नाही. अमितभाईंनी शिवसेना संपवण्याची भाषा करण्यापेक्षा शिवसेनेला असा सल्ला देणं, आवाहन करणं किंवा सरकार आहे तेव्हा जुने हिशेब काढण्याचा तो मुद्दा होता. तरीही शिवसेनेला आणि संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे ते शिवसेनेला संपवणार, मसनात गेले, काय काय बोलले. अमितभाई असं व्यक्तिमत्त्व  आहे, भाजप हा पक्ष असा आहे कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ही बातमी पण वाचा : … त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून जिवंतपणीच श्राद्धे घातलीत; शिवसेनेचे अमित शहांना उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER