अमित शहा यांचा कोरोना रिपोर्ट ‘निगेटिव्ह’, मात्र सध्याच सुट्टी नाही

Amit Shah

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कोरोनावर (Corona) मात केली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ (Report Negetive) आला. २ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात शहा यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शहा यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला, तरी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आले नाही. शहा यांचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात येईल.

अमित शहा यांना २ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शहा यांच्या संपर्कात आलेल्यांना ‘क्वारंटाईन’ केले होते. यात केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी स्वतःला होम क्वारंटाईन (Home Quarantine) केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER