अमित शहा यांचा बेळगाव दौरा ठरणार लक्षवेधी

Amit Shah

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची आज (ता.१७) बेळगावात सभा होत आहे. जनसेवक मेळावा असे नामकरण करण्यात आलेल्या मोहिमेचा बेळगावात समारोप होणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सभेसाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गोविंद कारजोळ यांच्यासह वीसहून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, अमित शहांच्या बेळगावमध्ये कडाडून विरोध होत आहे. अमित शहा गो बॅक असा नारा शेतकऱ्यांनी दिला. चन्नमा चौकात शेतकऱ्यांनी अर्धनग्न निदर्शने केली. जिल्हा क्रीडांगणावर सायंकाळी 4 वाजता सभा होत असून, यासाठी तीन जिल्ह्यातील सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या बॅनर, कटआऊटस् आणि भाजपच्या झेंड्यांनी शहर व्यापून गेले आहे.

दौऱ्यामुळे शहा यांच्या स्वागताचे कट आऊटस, स्वागत कमानी, भाजपच्या झेंड्यांनी शहर व्यापून गेले आहे. सांबरा विमानतळ ते जिल्हा क्रीडांगणापर्यंत सर्व रस्त्यावर स्वागत फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सदाशिवनगर, मुख्य बसस्थानक रस्ता, अशोक चौक, चन्नमा चौक आदी मार्गही स्वागत फलकांनी व्यापून गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER