अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द, मात्र पश्चिम बंगालच्या दौ-यात बदल नाही

shahdidi

मुंबई :- स्वाईन फ्लू झाल्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचारासाठी दाखल करावे लागले परिणामी त्यांचा कोल्हापूर आणि सांगलीचा 24 जानेवारीचा दौरा रद्द केला. मात्र शहा मंगळवारी होणा-या त्यांच्या पश्चिम बंगालच्या दौ-यात कुठलाही बदल करण्यात आला नाही. शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यात या दोन जिल्ह्यातल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी-भेटी घेणार होते. तसेच राज्यातल्या नेत्यांनाही भेटणार होते. मात्र त्यांच्या सर्वच कार्यक्रमांची फेररचना झाल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

भाजपच्या रथयात्रेला कोर्टाने परवानगी नाकारल्यामुळे अमित शहा तिथे जाहीर सभा घेणार आहेत. शनिवारी कोलकत्यात झालेल्या शक्तिप्रदर्शनानंतर अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.