अमित शहा-योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

Yogi Adityanath - amit shah - Maharastra Today

मुंबई :- सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयाला धमक्यांचे मेल आल्यामुळे सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या आहेत. धमक्यांच्या मेलमध्ये राज्यातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, विमानतळे आणि मल्टिप्लेक्स निशाण्यावर आहेत, बॉम्बहल्ला करण्याची धमकी दिली आहे. माहितीनुसार हे मेल चार-पाच  दिवसांपूर्वी आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या जीवाला धोका असल्याचे या धमक्यांच्या मेलमधून समोर आले आहे. याबाबतची माहिती सीआरपीएफच्या सूत्रांनी एएनआय (ANI) वृत्तसंस्थेला दिली आहे. सीआरपीफला आलेल्या या धमक्यांचे  मेल पुढील तपासासाठी ANIसह इतर सुरक्षा एजन्सीकडे पाठवण्यात आले आहेत. माहितीनुसार, मेलमध्ये भारतात लपलेल्या लष्कर-ए- तोयब्बाचा उल्लेख केला आहे.

तसेच तीन राज्यांमध्ये २०० किलो हाय ग्रेड RDX पोहचवण्यात आल्याची माहितीसुद्धा मेलमध्ये देण्यात आली आहे. मेलमध्ये सांगितले की, महाराष्ट्रात ११ पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले करण्यासाठी सक्रिय आहेत. अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचे मेलमधून समोर आले आहे. ‘आम्ही अज्ञात आहोत. आम्ही एक आर्मी आहोत. आम्ही क्षमा करत नाही. आम्ही विसरत नाही. आमची वाट .’ अशा प्रकारे धमक्यांचे मेल आल्यामुळे राज्यातील एजन्सी पूर्णपणे मेलचे सोर्स आणि मेल करण्यामागच्या कटाचा  तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button