नारायण राणेंवर पक्षश्रेष्ठी खूश; अमित शहा कोकणात येणार

Amit Shah- Narayan Rane

मुंबई :- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गासह (Gram Panchayat Election) कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपला लक्षणीय यश मिळाले. नारायण राणे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेच्या कोकणातील या वर्चस्वाला आव्हान देणे भाजपला जमले, असे बोलले जात होते. त्यामुळे सध्या भाजप पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्या कामगिरीवर खूश असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा  (Amit Shah) येत्या ६ फेब्रुवारीला कोकणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला अमित शहा  उपस्थित राहणार आहेत.

सध्या दिल्लीत शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अमित शहा  यांचा हा कोकण दौरा अनिश्चित मानला जात होता. मात्र, आता त्यांनी  ६ फेब्रुवारीला कोकणात येण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता या दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER