अमित शहा मंगळवारपासून राजस्थान दौ-यावर

Amit Shah will be on Rajstan tour from tomorrow

जयपूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्यापासून (मंगळवार) एका दिवसाच्या राजस्थान दौ-यावर असून तिते ते पक्षातर्फे आयोजित अनेक कार्यक्रमात भाग घेतील. सामाजिक न्याय आणि अथिकारीता मंत्री अरूण चतुर्वेदी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, शहा हवाई मार्गाने सकाळी येथे पोहचतील. येथून ते मोती डुंगरी गणेश मंदीरलाही जातील.

यानंतर सूरज मैदान आणि बिडला ऑडिटोरियम येथे त्यांचे अनेक कार्यक्रम होईल. ज्यामध्ये सहकारीता सम्मेलन, शक्ती केंद्र सम्मेलन व प्रबुद्धजन सम्मेलन सामील आहे. शहा येथे नगर पालिका तसेच इतर लोकप्रतिनिधींशी बैठक करतील. उल्लेखनीय आहे कि, शहा हे अशावेळी दौरा करत आहे जेव्हा राजस्थान येथे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. विधानसभा निवडणुका या वर्षाअखेर होत आहे.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट यांनी शेतक-यांना त्यांच्या मालाला किमान हमी भाव न मिळणे तसेच बेरोजगारीच्या मुद्दा उचलण्याबाबत चतुर्वेदी म्हणाले, केंद्राने शेतक-यांच्या उत्पादनाला दीड पट हमी भाव वाढविला आहे आणि प्रदेश सरकारने सुमारे 15 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या शासनकाळात करण्यात आलेल्या कार्याची तुलना करून वक्तव्य दिले पाहिजे.