बाळासाहेबांच्या विचारांना तापी नदीत टाकून उद्धव ठाकरे सत्तेत बसले – अमित शहा

Amit Shah - Uddhav Thackeray

सिंधुदुर्ग : भाजपा (BJP) नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात तब्बल दीड वर्षानंतर शिवसेनेला (Shiv Sena) मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या शब्दाचा खुलासा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत कुठलाही शब्द दिला नव्हता, मात्र विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांना तिलांजली दिली. सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन केले, असा जोरदार हल्लाबोल अमित शहा यांनी केला.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात तीन चाकी ऑटो रिक्षाची सरकार बनली, ज्याचे तीनही चाकं वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. एक पूर्व, दुसरा पश्चिम तर तिसरा वेगळ्या दिशेने चालतो. महाराष्ट्राच्या जनतेनी दिलेल्या जनादेशाचा अनादर करुन सत्तेच्या लालसेपोठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं. महाराष्ट्रातील जनतेचा जनादेश हा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी होता. ते म्हणतात, आम्ही वचन तोडलं आहे. मी तुम्हाला आठवण करुन देतो, आम्ही तर शब्दाचे पक्के माणसं. अशाप्रकारे खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये नितीश यांना वचन दिलं होतं. त्यांनी जनादेशानुसार तुमचा मुख्यमंत्री बसवला. आम्ही वचनाला पक्के होतो, आम्ही नितीश यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं.सहकारी कारखानदार भाजपा नेत्यांना घाबरवत आहे, त्याच्या सारखे आम्ही फडवणीस यांनी केले असते तर पक्ष ही राहिला नसतां. भाजपा नेते घाबरत नाही संघर्ष करत राहतील.

ते म्हणतात एका बंद दराआड चर्चा झाली. बंद खोलीत मी वचन दिलं. पण मी कधीच खोलीत असेवचन देत नाही. जे आहे ते सर्व सार्वजनिकरित्या करतो. मी कधीच खोलीत राजकारण केलं नाही. मी तसं कुठलंच वचन दिलं नाही. तुम्ही मोदीजींच्या नावाने प्रचार केला. आम्ही त्यांच्यादेखत प्रचार केला. त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे म्हणालो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वविचारांना तिलांजली देऊन ते सत्तेवर बसले आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

सर्वात आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. या भूमीकडून प्रचंड चेतना मिळते. कारण याच भूमीने संपूर्ण देशाला स्वदेशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जीव देण्याचा संस्कार दिला आहे. जेव्हा मुघलांचं राज्य होतं, औरंगजेबाचं राज्य होतं, तेव्हा चहुबाजूने अंधार होता, कुठेही प्रकाशाची चिन्ह दिसत नव्हतं. त्यावेळी एका युवा बालक शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भाषा करत संपूर्ण देशाला चेतना दिली. तेव्हापासून सुरु झालेली ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत (PM Narendra Modi) सुरु आहे. आता मोदींच्या नेतृत्वात भारताला विश्वात नाव कमवायचं आहे. शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारचे साहस केलं. त्यांनी हिंदवी समाजाची स्थापना केली. अनेक पराक्रम केले. आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी स्वधर्मासाठी लढले. भारतात सर्वात पहिले नौसेना बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी याच पवित्र भूमित केलं, असं अमित शाह म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER